NMK News: राज्याच्या आरोग्य विभागाने नव्याने स्थापन केलेल्या आणि श्रेणीवर्धित आरोग्य संस्थांसाठी कुशल आणि अकुशल मनुष्यबळाच्या २,६०३ पदांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. १० सप्टेंबर २०२४ रोजी हा निर्णय जाहीर करण्यात आला असून, २०२४-२५ ते २०२६-२७ या तीन वर्षांसाठी या जागा भरण्यात येणार आहेत.
यासाठी सरकारकडून वार्षिक ५९ कोटी ८७ लाख रुपये खर्च होणार आहे. या कंत्राटी पदभरतीची कार्यवाही आरोग्य सेवा आयुक्तांमार्फत करण्यात येणार आहे. या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांनी आणि विरोधकांनी पुन्हा एकदा टीका केली असून, या कंत्राटी भरतीला विरोध होत आहे.
स्रोत: लोकमत